Joshua 16

1योसेफ वंशाला नेमून दिलेली जो भाग चिठ्या टाकून ठरवला तो हा, याची सीमा यरीहोजवळ यार्देन नदीपासून यरीहोच्या पूर्वेकडल्या जलसंचयापाशी जाऊन रानातील डोंगराळ प्रदेशांतून बेथेलास निघते. 2मग बेथेलापासून लूजास जाऊन अर्की लोकांची सीमा अटारोथ याजवळून गेली.

3मग पश्चिमेस यफलेटी लोकांच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोनाच्या सीमेपर्यंत व गेजेरापर्यंत उतरून गेली; आणि तिचा शेवट समुद्राजवळ होता. 4याप्रमाणे योसेफाची वंशज मनश्शे व एफ्राइम यांस वतन मिळाले.

5एफ्राइमाच्या वंशजाचे जे त्यांची सीमा कुळाप्रमाणे अशी पडली की त्यांच्या वतनाची सीमा अटारोथ-अद्दार याच्या पूर्वेपासून वरल्या बेथ-होरोना पर्यंत होती. 6आणि ती सीमा मिखमथाथाजवळ समुद्राकडे उत्तर बाजूस गेली, आणि पूर्वेस तानथ-शिलोपर्यंत ती सीमा वळली, मग तेथून पुढे पूर्वेस यानोहा तेथवर गेली. 7नंतर ती यानोहा पासून अटारोथ व नारा येथपासून उतरली, मग यरीहोस मिळून बाहेर यार्देनेस गेली.

8तप्पूहा यापासून पश्चिमेस काना ओढ्यापर्यंत सीमा गेली; आणि तिचा शेवट समुद्रापर्यंत होता; एफ्राइमाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन आहे. 9आणि मनश्शेच्या वंशजाच्या वतनापैकी कित्येक नगरे एफ्राइमाच्या वंशजासाठी वेगळी केलेली होती; ती सर्व नगरे व त्यांची गांवे होती;

तथापि जे कनानी गेजेरात राहत होते. त्यास एफ्राइम्यांनी घालविले नाही; यास्तव ते कनानी एफ्राइमामध्ये आजपर्यंत राहत आहे; आणि नेमून दिलेले काम करण्यास ते दास झाले आहेत.

10

Copyright information for MarULB